डॉक्टरांना प्रॅक्टिस सुरू करा नाहीतर परवाने रद्द करू म्हणाल तर मग परवाने रद्द

मंत्री टोपे साहेब 1000/1200 चे PPE kit नाही ठीक आहे. Fumigator नाही ठीक आहे. आता 50 रूपयांच्या Formalin च्या गोळ्याही बाजारात उपलब्ध करून दिल्या नाहीत आणि खाजगी डॉक्टरांना प्रॅक्टिस सुरू करा नाहीतर परवाने रद्द करू म्हणाल तर मग परवाने रद्द करूनच टाका.


ग्लोज, मास्क, कॅप, एप्रन वर दवाखाना चालू ठेवून पाहिला. Respiratory infection चे पेशंट बाहेरच्या बाहेरच तपासले. दवाखान्याचे निर्जंतुकीकरण करणारे Formalin गोळ्याही मार्केट मध्ये उपलब्ध नसतील.


आणि दवाखान्याच्या आतील बाहेरील वस्तू Fomite बनून संसर्ग पसरवण्यास कारणीभूत झाली तर जबाबदार कोण?


माझ्या दवाखान्यातून कुणाला संसर्ग झाला नाही तरी माझ्याकडे येऊन गेलेल्या कुणाला किंवा त्याच्या नातेवाईकाला संसर्ग झाला आणि त्याने माझ्यावर केस टाकली तर सरकार मला काय मदत करणार आहे?


भिलवाडा राजस्थान मध्ये कोरोना संदर्भात अशी एक केस सुरू आहे.


आणखी एक Infrared Thermometer चे पूर्वी 1200 ते 1800 रुपयांपर्यंत मिळत होते ते आता अचानक 12000 ते 18000 रुपयाला मिळू लागले आहे.


ते डॉक्टरांना फुकट नका पण आधीच्या किमतीत उपलब्ध करून घ्या.


PPE कीट नका देऊ, Fumigator नका देऊ पण साध्या Formalin च्या गोळ्या तरी बाजारात उपलब्ध करा.


नाहीतर कमीत कमी परवाने रद्द करायच्या धमक्या तरी देऊ नका.


#CMOMaharashtra
#RajeshTope


Popular posts
कोरोनाची टेस्ट किट तयार केली
जलगांव की छात्रा भाग्यश्री पाटिल ने ग्रीस में प्रतियोगिता में शतरंज के खेल में स्वर्ण पदक जीता
Image
किसानों को ऋण माफी सहायता प्रदान करने के लिए निर्धारित किया जाता है। -नवल किशोर राम कलेक्टर, पुणे
Image
सांगलीत २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?* *कोरोनाची साखळी असते तरी कशी ?*
हाक तुमचि ______साथ आमची आपल्या शहरामधे आमचे सहकारी नगर उपाध्यक्ष आबा इंगळे,नगरसेवक बप्पा नळे नगर स्वत: फिरुन नागरीकांना दिलेल्या वेळामधे सुरक्षित अंतर मधे उभा राहुन खरेदी करा अशी हात जोडुन विनंती करतोय , कृपया आपण सर्वांनि स्वत:ची काळजी घ्यावी ही विनंती #कृपया_गंभीर_व्हा !! *अक्षय ढोबळे,नगरसेवक ,युवासेना जिल्हाप्रमुख !!*